भारतीय संगीत, भारतीय शिल्पकला, योगशास्त्र, वास्तुशास्त्र यांचा ज्या प्रमाणात जगभर स्वीकार झाला, त्या प्रमाणात भारतीय वैद्यक प्रणालीचा झाला नाही. आयुर्वेद म्हणजे नुसते पंचकर्म किंवा मसाज नव्हे, फक्त 'जडीबुटी' नव्हे; 'साईड इफेक्ट्स नाहीत म्हणजे आयुर्वेद' नव्हे. या सर्वांच्या पलीकडे, पक्क्या अशा स्वतःच्या सिद्धांतांवर आधारित 'कारण - कार्या'वर आधारलेले संपूर्ण शास्त्र आहे.